Ad will apear here
Next
‘आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी’ची पुणे-गोवा सायकल मोहीम यशस्वी

पुणे : ‘आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी’ संस्थेच्या रौप्यमहोत्सवाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेली पुणे ते गोवा सायकल मोहीम बुधवारी, नऊ जानेवारी रोजी यशस्वीरीत्या पूर्ण झाली. या मोहिमेत विद्यार्थी, सहाय्य्क कर्मचारी, प्रशासकीय सेवक मिळून ६१ जण सहभागी झाले होते. या सायकलपटूंनी ४९२ किलोमीटरचा हा प्रवास पुणे-कराड-कोल्हापूर-बेळगाव मार्गाने चार दिवसात पूर्ण केला. हे सायकलपटू नऊ जानेवारी रोजी गोव्यातील बांबोळी येथील लष्कराच्या सिग्नल ट्रेनिंग सेंटरला पोहोचले.
 
या मोहिमेची सुरुवात शनिवारी, पाच जानेवारी रोजी संस्थेच्या दिघी येथील आवारातून झाली. संचालक ब्रिगेडिअर अभय भट यांनी सायकलपटूंना निरोप दिला. या वेळी संस्थेतील विद्यार्थी, अध्यापक आणि प्रशासकीय कर्मचारी उपस्थित होते. एआयटीचे सहसंचालक कर्नल के. ई. विजयन यांच्या पुढाकाराने ही सायकल मोहीम पार पडली.  

‘अशा उपक्रमांतून तरुण पिढीला भविष्यात संभाव्य कठीण आव्हानांना सामोरे जाण्याची मानसिक आणि शारीरिक ताकद मिळते’, असे कर्नल विजयन म्हणाले. 


संस्थेचे संचालक ब्रिगेडिअर अभय भट हे स्वतः मोहिमेच्या पुणे-सुरूर या ९२ किलोमीटरच्या पहिल्या टप्प्यात सहभागी झाले होते. बांबोळी येथे स्टेशन कमांडर आणि सिग्नल ट्रेनिंग सेंटरचे कमांडंट यांनी मोहिमेतील सायकलपटूंचे स्वागत केले.

ब्रिगेडिअर भट म्हणाले,  ‘आमच्या संस्थेच्या दृष्टीने हा संस्थेच्या रौप्यमहोत्सवानिमित्त आयोजित झालेला एक सन्मानाचा योग आहे. या २५ वर्षात संस्थेच्या विद्यार्थ्यांची सर्वांगीण प्रगती आणि विकास व्हावा यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील राहिलो आहोत. विद्यार्थ्यांमध्ये साहसाची आवड उत्पन्न व्हावी आणि त्यांना सर्वांगीण शारीरिक तंदुरुस्तीचे महत्त्व पटावे या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या सायकल मोहिमेमुळे आमची विद्यार्थ्यांना सर्वोत्कृष्ट दर्जाचे शिक्षण देण्यावर असलेली निष्ठा अधोरेखित झाली आहे. विद्यार्थ्यांचा उत्साह आणि निग्रहामुळे ही मोहीम यशस्वीपणे पार पडली. आमच्या विद्यार्थ्यांनी ‘ऑनवर्ड टु ग्लोरी’ (कीर्ती शिखराकडे वाटचाल) हे ध्येय या मोहिमेद्वारे सिद्ध केले.’

एआयटी सायकलिंग क्लबचे सचिव सार्थक वासुदेवा म्हणाले, ‘संस्थेच्या या पहिल्या सायकल मोहिमेत सहभागी होताना आम्ही अत्यंत उत्साहात होतो. या मोहिमेसाठी आम्ही गेले दोन महिने कसून तयारी आणि प्रशिक्षण घेतले. त्यामुळे ही मोहीम आम्ही नियोजित वेळी पूर्ण करू शकलो. मानसिक बळ, चिकाटी आणि दुर्दम्य इच्छाशक्ती यांचे अशा मोहिमेच्या दृष्टीने महत्त्व किती मोठे आहे हे आम्ही या प्रशिक्षणादरम्यान शिकलो.’
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/BZSOBW
Similar Posts
‘आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’च्या माजी विद्यार्थ्यांचा शनिवारी मेळावा पुणे : येथील ‘आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’च्या (एआयटी) माजी विद्यार्थ्यांचा मेळावा येत्या शनिवारी, २२ डिसेंबर रोजी संस्थेच्या दिघी कॅंपस येथे होणार आहे. दिवसभर चालणाऱ्या या मेळाव्याला ‘आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’ने जगभरातील माजी विद्यार्थ्यांना निमंत्रित केले आहे. या मेळाव्यात उत्तम यश मिळविलेल्या
‘ग्रामीण भागात ‘इनोव्हेशन’ला अधिक वाव’ पुणे : ‘विद्यार्थ्यांमधील नावीन्यतेला प्रोत्साहन देण्यासाठी मनुष्यबळ विकास मंत्रालय आणि अखिल भारतीय तंत्रशिक्षण मंडळ अनेक उपक्रम हाती घेत असून, इनोव्हेशन पॉलिसी तयार करीत आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता मोठ्या प्रमाणात आहे; मात्र आवश्यक संसाधनांअभावी त्यांना पुरेशी संधी मिळत नाही. त्यामुळे
आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीतर्फे पदवी प्रदान सोहळा पुणे : आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचा (एआयटी) चौथा वार्षिक पदवीदान समारंभ ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. संस्थेच्या दिघी येथील संकुलात झालेल्या या सोहळ्यात यंदा २८० विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली.
‘आर्मी इन्स्टिट्यूट’चे रौप्यमहोत्सवी वर्षांत पदार्पण पुणे : उच्च शिक्षण क्षेत्रातील एक अव्वल दर्जाची संस्था म्हणून नाव मिळवलेल्या आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजीने (एआयटी) २५ व्या वर्षांत प्रवेश केल्यानिमित्त २४ फेब्रुवारी २०१९ रोजी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language